विदर्भाच्या ‘हिरव्या’ स्वप्नावर फेरले पाणी

May 16, 2012 1:16 PM0 commentsViews: 6

16 मे

विदर्भात सिंचनाचा प्रश्न गेल्या 60 वर्षांपासून कायम आहे. अनेक योजना आखल्या गेल्या पण तरीही विदर्भातल्या शेतकर्‍यांच्या शेतीला पाणी मिळू शकलेलं नाही. दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना पाणी मिळावं यासाठी गोसीखूर्द प्रकल्प उभारण्यात आला. पण 27 वर्षांनंतरही हा प्रकल्प रखडलेलाच आहे.

विदर्भातील दुष्काळग्रस्त शेतकर्‍याना हिरवी स्वप्न दाखवणारा गोसीखूर्द प्रकल्प. 1983 साली या प्रकल्पाची सुरुवात झाली. चार वर्षात हा प्रकल्प पूर्ण होणं अपेक्षित होतं पण आज 27 वर्षांनंतरही तो अपूर्ण आहे. या प्रकल्पाचा नियोजित खर्च होता 372 कोटी पण त्याचा सध्याचा खर्च आहे तब्बल 7 हजार 778 कोटी. तीन लाख हेक्टर जमीन ओलीताखाली आणणार्‍या या प्रकल्पातून गेल्या 27 वर्षात शेतकर्‍यांना थेबबर पाणीही मिळालं नाही. याला विदर्भातील राजकीय नेत्यांचाच नाकर्तेपणा जबाबदार असल्याचा आरोप होतोय.

गेल्या 27 वर्षांत अनेक सरकारं बदलली. बरेच मुख्यमंत्री होऊन गेले पण या प्रकल्पाला कोणीही गांभिर्यानं घेतलं नाही. हिवाळी अधिवेशनात थोडेफार पैसे देऊन बोळवण करायची आणि नंतर पाठ फिरवायची त्यामुळेच हा प्रकल्प कायम रखडला. यात पुनर्वसनाच्या प्रश्नाचही घोंगडं कायम भिजत राहिलं.

या प्रकल्पासाठी आजवर कोट्यवधीं खर्च झाले. यात अनेक गैरव्यवहार झाल्याचा आरोप होतोय. कधी कंत्राटदारांना कामाआधिच बिलं दिली गेली. तर कधी एकच काम अनेकदा करण्यात आलं. त्यामुळे हा प्रकल्प पाणी अडवण्यासाठी सुरु केला की पैसा जिरवण्यासाठी हेच विदर्भातील शेतकर्‍यांना कळत नाही.

गोसीखुर्द प्रकल्प

प्रकल्पाची सुरुवात : 1983 4 वर्षात पूर्ण होणं अपेक्षित27 वर्षं रखडला प्रकल्पनियोजित खर्च : 372 कोटी सध्याचा खर्च : 7,778 कोटी एकूण वाढ : 7,406 कोटी

close