‘आम्हाला मुलगा किंवा मुलगीही नको होती’

May 19, 2012 4:34 PM0 commentsViews: 39

19 मे

आम्हाला चार मुली आहे पण पाचवीही मुलगी होणार असल्याचं कळालं मग मुलगाही नको आणि मुलगी नको यासाठी मी माझ्या पतींनीला डॉ.मुंडेच्या हॉस्पिटलमध्ये पाठवले. या हॉस्पिटलविरोधात यापूर्वी स्त्री भ्रूण हत्येसंदर्भात 3 गुन्हे दाखल आहेत हे आम्हाला माहित होते पण इथच आम्ही चुकलो अशी कबुली गर्भपात करताना मृत महिलेच्या पतीने आयबीएन लोकमतकडे दिली. मात्र या प्रकरणात मृत्यू झालेल्या महिलेच्या पतीवर अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. पोलिसांनी पतीला ताब्यातही घेतले नाही. चार मुली झाल्यानंतर पाचवी मुलगी आहे हे गर्भलिंग निदान चाचणी केल्यावर कळल्यावर या पतीने आपल्या पत्नीला डॉक्टर मुंडे यांच्याकडे नेलं.

close