मुलुंडमध्ये नाल्यातून मगर जेरबंद

May 18, 2012 11:43 AM0 commentsViews: 6

18 मे

मुंबईतल्या मुलुंड भागातल्या रहिवासी वस्तीत मगर दिसल्याने जोरदार खळबळ उडाली. गणेशवादी नमक चाळी लगत असलेल्या नाल्यात रात्री उशीरा ही मगर दिसली. हा परिसर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जवळ असल्याने बरेच जनावर या चाळीपर्यंत येण्याच्या घटना वाढत आहेत. या चाळीजवळ निघणार्‍या नाल्याचा उगम हा संरक्षित उद्यानातून आहे. तातडीने घटनास्थळी पोहोचलेल्या वनअधिकारी आणि पोलिसांनी स्थानिक रहिवाशांच्या मदतीनं मगरीला नाल्यातून बाहेर काढण्यात यश मिळवलं. 6 ते 7 फूट लांब असलेल्या या मगरीचं वय जवळपास 10 वर्ष असल्याचं सांगण्यात येतंय. या मगरीला आता पवईच्या तलावात सोडण्यासाठी वनाधिकार्‍यांनी नेलं आहे.

close