‘ममतादीदी को गुस्सा क्यू आया ?’

May 19, 2012 4:58 PM0 commentsViews: 5

19 मे

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आपल्या तापटपणाबद्दल प्रसिध्द आहेत. याचाच अनुभव काल कोलकत्यात झालेल्या एका कार्यक्रमात आला. ममता बॅनजीर्ंच्या सरकारला 1 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने CNN-IBN नं आयोजित केलेल्या कार्यक्रमात अडचणीचे प्रश्न विचारल्यानं दीदी भडकल्या. कार्यक्रमाला आलेल्या विद्यार्थिनींनी वाढत चाललेल्या गुन्हेगारीबाबत प्रश्न विचारला. अस्वस्थ झालेल्या दीदींनी तुम्ही माकपच्या कार्यकर्त्या आहात असा आरोप केला. इथं आलेल्या लोकांपैकी 50 टक्के लोक माकपचे आहेत असा आरोप करत आपल्याला अशा लोकांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची नाहीत असं सांगत भर कार्यक्रमातून ममतांनी काढता पाय घेतला.

close