विद्यार्थ्यांनी तयार केली ‘अ ॅग्रो -स्कूटर’!

May 23, 2012 12:06 PM0 commentsViews: 48

23 मे

पिंपरी-चिंचवडच्या तीन मित्रांनी मिळुन शेतकर्‍यांसाठी बहुउपयोगी असलेली एक स्कूटर तयार केली आहेत. पिंपरीतल्या या तीन विद्यार्थ्यांनी तयारकेलेल्या या स्कूटरचा उपयोग शेतकरी तब्बल बारा कामासाठी करु शकतात.सर्वांची परीचित असलेली स्कूटर ही आता काल बाह्य झाली. परंतु केवळ स्कूटरच ही असं वाहन आहे जिच्या मॅग्नेट फॅनवर बदल करणे सोपे जाते. तसंच तिच्या इंजीनची शक्तीही अधीक असते. स्कूटरची हिच विशेष बाब लक्षात घेत आणि कालबाह्य झालेल्या स्कूटरचा उपयोग शेतकर्‍यासाठी करण्याच ठरवलं आणि त्यावर मेहनत घेऊन साकारली ही ऍग्रो -स्कूटर…या स्कूटरव्दारे विहिरीतील पाणी काढणं, फवारणी करणं, गवत कापणं, आणि मोबाईल चार्जिंग केला जाऊ शकते. त्यासाठी लागणारी सर्व यंत्र या स्कूटरवर बसविण्यात आली आहेत. त्याच बरोबर या स्कूटरच्या साह्याने छोट्या प्रमाणात विजेची निर्मिती केली जाऊ शकते तसेच यामध्ये विजेची साठवणही करता येऊ शकते. त्यामुळे अल्प- भुधारक व गरीब शेतकर्‍यांना ही स्कूटर उपयुक्त ठरेल असा दावा या विद्यार्थ्यांनी केला आहे.

close