एनएसजीच्या धर्तीवर कमांडो पथक स्थापणार – जयंत पाटील

December 17, 2008 12:34 PM0 commentsViews: 35

17 नोव्हेंबर, नागपूरआशिष जाधवगृहमंत्री जयंत पाटील यांनी आज विधानसभेत महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. मोहम्मद अजमल कसाबचा खटला चालवण्यासाठी स्पेशल कोर्ट, एनएसजी कमांडोच्या धर्तीवर महाराष्ट्रात कमांडो पथक आणि मुंबई पोलीस दलाला एमपी 5 या अत्याधुनिक बंदुका देण्यात येणार असल्याचं जयंत पाटील यांनी स्थगन प्रस्तावावरील चर्चेदरम्यान सांगितलं. काल विधानसभेत दहशतवादी हल्ल्यासंदर्भात विरोधी पक्षांनी सरकाराला कोंडीत पकडलं होतं. आज स्थगन प्रस्तावावरील चर्चेत गृहमंत्री जयंत पाटील यांनी ही माहिती दिली. गेल्या तीन दिवसांपासून विधानसभेत मुंबईवरील हल्ल्यासंदर्भात चर्चा सुरु आहे. स्थगन प्रस्तावावरील भाषणात जयंत पाटील म्हणाले, मुंबई पोलीस दलाला एमपी 5 या अत्याधुनिक 250 बंदुका देण्यात येतील. एनएसजीच्या धर्तीवर नवं कमांडो दल स्थापन केलं जाणार आहे. या दलाला शिकागो पोलीस प्रशिक्षण देणार आहेत. कमांडो दलाला एमपी 5 च्या 250 बंदुका देण्यात येतील. मुंबईत 41 ठिकाणी बोटी किनार्‍याला लागू शकतात, त्या ठिकाणांवर कडक नजर ठेवण्यात येईल. 127 कोटी रुपये गृहखात्याच्या सक्षमीकरणासाठी देण्यात येतील '. हल्ल्याप्रकरणी एकमेव पकडण्यात आलेला जिंवत अतिरेकी कसाबच्या खटल्यासाठी स्पेशल कोर्ट स्थापन करण्यात येणार आहे. अ‍ॅड. उज्ज्वल निकम हे सरकारी वकील म्हणून काम पाहतील, हे जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं. मच्छिमारांना ओळखपत्र देण्याबाबत केंद्र सरकाराशी चर्चा करु, असं ही पाटील म्हणाले. जयंत पाटील यांच्या भाषणानंतर विरोधी पक्ष नेते रामदास कदम म्हणाले, अनामी रॉय आणि हसन गफुर यांना बडतर्फ केलं नाही तर विरोधक सभागृह चालु देणार नाही. मंत्री उपस्थित नसल्यामुळे विधानपरिषद 5 वेळा तहकूब करण्यात आलं. अतिरिक्त पोलीस आयुक्त वेकंटेशन यांची ताजची सुरक्षा व्यवस्था काढण्याची सूचना केली होती. याप्रकरणी सरकारनं खुलासा करावा '.विधानसभेत पोलीस तपासातून समोर आलेली दहशतवाद्यांच्या हल्ल्याच्या कटाची माहिती जयंत पाटील यांनी सांगितली. 'अतिरेक्यांनी मुंबईवरील हल्ला 3 महिने पुढे ढकलला होता. हल्ल्याच्या दिवशी अतिरेकी मुंबई किनार्‍यापासून 4 नॉटिकल मैल दूरहोते. दुपारी 4 ते सायंकाळी सव्वा सातपर्यंत ते तिथेत होते. अंधार पडल्यावर ते बधवार पार्कच्या दिशेने निघाले. अतिरेकी रात्री 8.15 ते 8.30 वाजेच्या दरम्यान ते बधवार पार्कला पोहोचले. सीएसटी वर प्लेटफॉर्म 12 ते प्लेटफॉर्म 1 पर्यंत गोळीबाराबरोबरचअतिरेक्यांनी हॅण्ड ग्रेनेडही टाकले. कसाबनं टॅक्सीत बॉम्ब ठेवला. ओबेरॉय हॉटेलमध्ये 9 मिनिटांत अतिरेकी पोहोचले. 26 नोव्हेंबरच्या हल्ल्यानंतर 460 ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं.अतिरेक्यांचा हल्ला अचानक होता. त्यामुळे कुठल्याही राज्याचं सरकार त्याचा प्रतिकार करू शकलं नसतं ', असं पाटील यांनी विधानसभेत सांगितलं.

close