ढोबळेंची मुक्ताफळं !

May 29, 2012 11:57 AM0 commentsViews: 9

29 मे

राज्यातील दुष्काळाच्या परिस्थिती ही 1972 पेक्षाही भीषण आहे, असं महिन्याभरापूर्वी म्हणणार्‍या पाणी पुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांना आता वेगळाच साक्षात्कार झाला. राज्यातला दुष्काळ मोठा नाही तो मीडियाचा बागुलबुवा असल्याची मुक्ताफळं मंत्री महोदयांनी उधळली.

लक्ष्मणरावांच्या या बेताल विधानावर सर्व स्तरातून टीकेची झोड उठली. भाजपने ढोबळेंच्या हकालपट्टीची मागणी केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं तर त्यांच्याविरोधात मोर्चा काढला.

दिवसभर चहूबाजूंनी टीका झाल्यानंतर.. तो मी नव्हेच, असं म्हणत ढोबळेंनी पुन्हा एकदा मीडियावरच खापर फोडलं. आधी जखमेवर मीठ चोळायचं आणि नंतर कोलांटउडी घ्यायची, हे टिव्ही पत्रकारितेच्या दिवसात सोपं नाही, हे मंत्रिमहोदयांना ठाऊक नसावं.

close