डाळिंबांना साड्यांची सावली

May 30, 2012 4:12 PM0 commentsViews: 15

30 मे

राज्यात दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस रौद्ररुप धारण करत आहे. दुष्काळाने होरपळलेल्या जनतेला हंडाभर पाणी आणण्यासाठी पायपीट करावी लागते. उभी पिकं पाण्याअभावी जळून जात आहेत. मात्र अहमदनगर जिल्हयातल्या पाथर्डी तालुक्यातील मेरी येथील शेतकऱय्‌ाने डाळिंबांच्या बागांची सुरक्षा करण्यासाठी 10 हजार झाडांना चक्क 15 हजार साड्यांनी सावली धरली आहे. 40 एकर जमिनीवर रंगीबेरंगी साड्यांनी झाकलेली ही डाळिंबाची शेती आहे . उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी या साड्यांचा वापर केला जात आहे. तब्बल 15 हजार साड्या लावल्यामुळे या शेतकर्‍याला आता शेतीची राखणदारी करावी लागत आहे. उन्हापासून संरक्षणाला लावलेल्या साड्यांना हात नका लावू असं वारंवार येणार्‍या-जाण्यार्‍यांना लोकांना सांगत आहे.

close