राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला

May 31, 2012 4:31 PM0 commentsViews: 8

31 मे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेली दोन दिवस ताडोबाच्या जंगलाचा दौरा केला. पण 3 दिवसांचा दौरा त्यांनी आज दुसर्‍याच दिवशी आटोपता घेतला. यात त्यानी जंगलातील वाघांच्या परिस्थितीचा आढावा घेतला. वाघाच्या गुहेतून बाहेर पडून सात वर्ष उलटल्यानंतर.. आता राज ठाकरेंना पुन्हा वाघोबाची आठवण आली. म्हणूनच.. शिकार्‍यांच्या पंज्यात अडकलेल्या ताडोबाच्या जंगलात त्यांनी दोन दिवसांचा दौरा केला. तिथली विदारक परिस्थिती पाहून संतापलेल्या राज ठाकरेंनी सरकारवर हल्ला चढवला.

राज ठाकरे यांच्या दौर्‍याने आपल्या खात्याची शिकार होणार हे लक्षात येताच वनमंत्री पतंगरावांनीही बाकीचे कार्यक्रम रद्द करून ताडोबाच्या जंगलाची वाट धरली. पण तरीही राज ठाकरेंनी जाता जाता पतंगरावांना पंज्या मारलाच..

मुंबईतल्या वाघाची शक्ती जरी मनसेमुळेच कमी होत असली. तर ताडोबातल्या व्याघ्रराजासाठी मात्र राज आता मैदानात उतरलेत. आता राज ठाकरेंनी डरकाळी फोडल्यानंतर तरी वाघांना न्याय मिळतो का, हे पाहावं लागेल.

close