शिकार्‍यांचं ‘एनकाउन्टर’ करणार्‍यास 5 लाखांचे बक्षीस -राज

June 1, 2012 4:21 PM0 commentsViews: 42

01 जून

वाघांच्या शिकार्‍यांची 'शिकार' करणार्‍या अधिकार्‍यांना मनसेतर्फे 5 लाख रुपये देण्यात येतील अशी महत्वपूर्ण घोषणा राज ठाकरे यांनी केली. तसेच वाघांच्या शिकार्‍यांची माहिती देण्यार्‍या गावकर्‍यांना दोन लाखांचे बक्षीसही राज यांनी जाहीर केले. वाघांच्या संरक्षणासाठी वनमंत्री पतंगराव कदम यांनी शिकार्‍यांना दिसता क्षणी गोळ्या घाला असा आदेश दिला आहे. राज यांनी कदम यांच्या आदेशाची आठवण करुन देत ताडोबात अधिकार्‍यांनी खर्‍या खुर्‍या शिकार्‍याची शिकार केली तर त्याला पक्षातर्फे पाच लाख बक्षीस देऊ असं जाहीर केलं.

close