राज ठाकरेंनी घेतली पालिका आयुक्तांची भेट

June 7, 2012 12:49 PM0 commentsViews: 3

07 जून

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबई महानगरपालिका आयुक्त सिताराम कुंटे यांची भेट घेतली. झोपडपट्या वाढत असताना एकाही पालिका अधिकार्‍यावर कारवाई का झाली नाही, असा सवाल राज ठाकरे यांनी आयुक्तांना केला. याचबरोबर पायाभूत सुविधांवर ताण पडतोय, त्यामुळे खाजगी विकासकांना सोबत घेतले पाहिजे. मिठी नदीच्या शेजारील अनधिकृत बांधकाम तोडले जात नाही तोपर्यंत हे प्रश्न सुटणार नाही असं मतही राज यांनी व्यक्त केलं.

close