सगळेच उद्योगधंदे बाहेर चालले हे खरं नाही – मुख्यमंत्री

June 9, 2012 4:50 PM0 commentsViews: 52

09 जून

उद्योजकांच्या महाराष्ट्राबद्दलच्या विश्वासाला धक्का बसलाय या केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या टीकेला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलंय. महाराष्ट्रातील उद्योगधंदे बाहेर चालले असं म्हणणं चुकीचं आहे. महाराष्ट्र अजूनही उद्योगांसाठी पसंतीचं ठिकाण आहे आज राज्यात मोठे प्रकल्प येत आहे आता आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे काही प्रकल्प बाहेर जात असतील. पण सर्वच उद्योग महाराष्ट्रात यावे, हा आग्रह कसा धरणार ? असा प्रतिसवाल मुख्यमंत्र्यांनी केला.

close