हेल्मेटसक्तीवर औरंगाबादचे नागरिक नाराज

December 17, 2008 8:34 AM0 commentsViews: 2

17 डिसेंबर, औरंगाबादऔरंगाबाद पोलिसांनी चालविलेल्या हेल्मेट सक्तीच्या विरोधात आता लोक रस्त्यावर उतरायला लागलेत. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज पोलिसांच्या मुजोरीविरूध्द निदर्शनं केली. या मोहिमेच्या नावाखाली पोलिसांनी शहरात गुंडगिरी चालवल्याचा आरोप होतोय. विशेष म्हणजे औरंगाबादचे पोलिस स्वतः हेल्मेट वापरत नाहीत मात्र दंडाच्या पावत्या फाडायला तत्पर असतात असा नागरिकांचा अनुभव आहे. पोलीस आयुक्त के एल बिष्णोई यांनी मात्र कायद्याचा दांडुका उगारणं सुरूच ठेवलं आहे.

close