बेकायदेशीर गर्भपात करणार्‍या बनावट डॉक्टराचा पर्दाफाश

June 11, 2012 11:32 AM0 commentsViews: 38

तुषार तपासे, सातारा

12 जून

स्त्रीभ्रूण हत्येचा विळखा फक्त एका बीडला नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला बसला आहे. सातार्‍यात एका गावात एका महिलेचा बेकायदेशीरपणे गर्भपात करण्यात आला. पण धक्कादायक बाब म्हणजे ज्या डॉक्टरनं हा गर्भपात केला, त्याचाकडे डॉक्टरकीची कुठलीच पदवी नाही.

या बनावट नाव आहे सिकंदर शेख… त्यानं अनेक स्त्रियांचे बेकायदेशीर गर्भपात केलेत. पण धक्कादायक बाब म्हणजे सिकंदरकडे डॉक्टरकीचा कुठलाच परवाना नाही. एवढंच नाही तर गुरांसाठी वापरण्यात येणारी सोनोग्राफी मशीन तो वापरायचा. ही माहिती मिळालीय एका बेकायदेशीर गर्भपाताची चौकशी सुरू झाल्यावर.

काशीळ गावातल्या एका 5 महिन्याच्या गर्भवतीला गर्भलिंगनिदानात तिसरीही मुलगीच असल्याचं कळलं आणि तिनं गर्भपात करण्याचं ठरवलं. याची माहिती उपजिल्हा रुग्णालयातल्या अधीक्षकांना मिळाली. त्यांनंतर त्या महिलेचा शोध सुरू झाला. पण जेव्हा ती सापडली तेव्हा तिचा गर्भपात झाला होता. आणि हा गर्भपात केला होता सिकंदर शेखनं..या बोगस डॉक्टरच्या हॉस्पिटलमध्ये गर्भपातासाठी लागणार्‍या औषधांचा मोठा साठा सापडला आहे. हॉस्पिटल सील करण्यात आलंय. स्त्रीभ्रूण हत्येचा कलंक पुरोगामी महाराष्ट्राच्या कपाळावरुन कधी मिटणार, हा खरा प्रश्न आहे.

close