नाशिकमध्ये झालं सिक्युरिटी ऑडीट

December 17, 2008 10:50 AM0 commentsViews: 8

17 डिसेंबर, नाशिकदीप्ती राऊतफायनान्शीयल ऑडीट, सोशल ऑडीट या पाठोपाठ आता सिक्युरिटी ऑडीट हा शब्द पुढे आला आहे. मुंबईतल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर आता राज्यातल्या महत्वाच्या ठिकाणांचं सिक्युरिटी ऑडीट करण्यात येतंय. नाशिक जिल्ह्यातल्या महत्वाच्या ठिकाणांचं सिक्युरिटी ऑडीट नुकतंच पूर्ण झालं.नाशिक जिल्ह्यातल्या धार्मिक स्थळांपासून अतिमहत्वाच्या प्रोजेक्टसमधल्या सुरक्षा व्यवस्थांची चाचपणी या ऑडीटमध्ये करण्यात आली. त्यात त्र्यंबकेश्वरचं मंदिर, मालेगाव शहर, सुखोईचं उत्पादन करणारं एचएएल, सप्तशृंगी देवी, मनमाडचा पानेवाडी पेट्रोलियम साठवणूक प्रकल्प यांचा समावेश आहे. " हे आमचं अंतर्गत ऑडीट आहे. खर तर वर्षातून किमान एकदा हा आढावा घेणं गरजेचं आहे. संपूर्ण शहराच्या सुरक्षिततेचा वस्तुनिष्ठ आढावा आम्ही घेतला आहे" असं पोलीस अधिक्षक निखिल गुप्ता यांनी सांगितलं.सध्या नाशिक जिल्ह्यात सोळाशे लोकांमागे एक पोलीस असं प्रमाण आहे. सिक्युरिटी ऑडीटमध्ये बरेच मुद्दे पुढे आलेत. त्यात महत्वाची मागणी आहे ती मालेगावसाठी स्वतंत्र बॉम्ब डीस्पोजल स्कॉडची. "आता स्वरूप बदलत चाललंय.. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची गरज आहे. प्रत्येक माणसानं आपापल्या सोशल, इंडिव्हीज्युएल लेव्हलला पार्टीसीपेट होण्याची गरज आहे" असं निखिल गुप्ता यांनी स्पष्ट केलं.या ऑडीटसाठी नागरिकांचं सहकार्यही पोलिसांना मिळालं. मंदिरांच्या ट्रस्टीजपासून खाजगी सुरक्षा यंत्रणांपर्यंत सर्वांनी सहकार्य करण्याची तयारी दाखवली आहे. पण तरीही गरज आहे ती पोलिसांची सक्षमता वाढवण्याची.

close