माऊलींच्या पालखीचं पंढरपुराकडे प्रस्थान

June 11, 2012 3:09 PM0 commentsViews: 33

12 जून

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीनं पंढरपुराकडे प्रस्थान केलं आहे. विठुनामाचा गजर करत आळंदीत हजारो वारकरी दाखल झाले आहेत. गेल्या दोन दिवसापासून आळंदीत वारकर्‍यांची रिघ सुरूच आहे. इंद्रायणीचा तीर, गोपाळपुरा, प्रदक्षिणा रस्ता वारकर्‍यांच्या गर्दीने फुलून गेला. टाळ, मृदंग आणि हरी नामाच्या गजरात सारा आसमंत दूमदूमन गेला.

close