कोयता

June 12, 2012 4:29 PM0 commentsViews: 128

बीड जिल्हा गेला महिनाभर चर्चेत आहे. मातेच्या गर्भाची लिंगचाचणी करायची आणि मुलगी असेल तर गर्भ पाडायचा. बीडमध्ये हे सर्रास सुरु होतं.. आणि आजही आहे. परळीच्या डॉ.सुदाम मुंडेच्या हॉस्पिटलमध्ये अशाच प्रकारे स्त्रीभ्रूण हत्या करताना एका आईचा जीव गेला. आणि हे प्रकरण जगासमोर आलं. डॉ.सुदाम आणि त्याची पत्नी सरस्वती मुंडे दोघंही तेव्हापासून फरार आहेत. तर शहरात मुलींना जन्माला येण्याआधीच मारण्याचा धंदा करणारे डॉ.शिवाजी सानप आणि प्रिया सानप गजाआड गेले. तर डॉ.माधव सानपच्या भगवान हॉस्पिटलवर सील करण्याची वेळ आली. या शहरातले खरे सूत्रधार डॉ.श्रीहरी लहाने यांनाही अटक झाली अटक आणि कारवाईचं सत्र अजूनही सुरुच आहे.

close