युपीएला गरज नसेल तर बाहेर पडणार – ममता

June 14, 2012 4:38 PM0 commentsViews: 36

14 जून

मी कोणाच्या धमकीला घाबरत नाही मला माहित आहे काय होऊ शकते आणि काय होऊ शकत नाही पण राष्ट्रपतीपदासाठी योग्य उमेदवार सांगण्याचा अधिकार आम्हाला आहे. एपीजे अब्दूल कलाम क्रमांक एकचे उमेदवार आहे त्यांच्या नावावर एकमत व्हावे. युपीएसोबत आम्ही अजून आहोत पण युपीएला गरज नसेल तर त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे असं थेट आव्हान ममतादीदींना काँग्रेसला दिले आहे.

राष्ट्रपतीपदावरुन काँग्रेस आणि मित्रपक्षात आज मोठा वाद निर्माण झाला. याबद्दल तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. राष्ट्रपतीपद हे देशाचे सर्वोच्चपद आहे यापदावर बसणार व्यक्तीही तितकाच चांगला असावा. आम्ही एपीजे अब्दूल कलाम, सोमनाथ चटर्जी, मनमोहन सिंग यांचे नाव सुचवले पण यात चुकीचे काय होते. कलाम यांनी याअगोदर राष्ट्रपतीपद भुषवले आहे त्यांच्या नावाला देशभरातून जनता पाठिंबा देत आहे तसेच ते कोणत्याही पक्षाचे नाही. त्यामुळे कलाम हेच क्रमांक एकचे उमेदवार आहे त्यांना आमचा पाठिंबा आहे असं ममतांनी सांगितलं. तसेच कोणी काही धमक्या देत असेल तर त्याला उत्तर देता येते. आम्हाला चांगले माहित आहे की काय होऊ शकते आणि काय होऊ शकत नाही. आम्ही युपीएसोबतच आहोत पण जर त्यांना आमची गरज वाटत नसेल तसा तो निर्णय घेऊ शकतात असंही ममतांनी ठणकावून सांगितलं.

close