अखेर डॉ.मुंडे दाम्पत्य पोलिसांपुढे शरण

June 18, 2012 7:59 AM0 commentsViews: 13

18 जून

बेकायदेशीर गर्भपात प्रकरणी गेल्या 26 दिवसांपासून फरार असलेले डॉ. मुंडे दाम्पत्य अखेर पोलिसांना शरण आले. काल रात्री उशिरा ते दोघं परळी पोलीस ठाण्यात दाखल झालेत. आज दुपारी 2 वाजता त्यांना कोर्टान हजर केलं जाणार आहे. दोघांनाही 10 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी यासाठी पोलिसांचे प्रयत्न आहेत. मुंडे दाम्पत्यांच्या शोधासाठी पोलिसांनी देशभर शोध मोहिम सुरु केली होती. अखेर आपल्यावरचा फास आवळलेला जात असल्याचं पाहून सुदाम मुंडे आणि सरस्वती मुंडे पोलिसांना शरण आलेत.

मुंडे हॉस्पिटलमध्ये विजया पटेकर या महिलेचा गर्भपात करतांना मृत्यू झाला होता. तसेच याअगोदरही मुंडेंच्या हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर गर्भपात करण्यात आल्याचं उघड झालंय. पोलिसांनी कारवाई सुरु करताचा मुंडे दाम्पत्य रातोरात फरार झाले होते. आपले आई वडील भरार झाले नसून तिरुपतीला दर्शनासाठी गेल्याचा खोटा दावा त्यांच्या मुलाने केला होता. मात्र फरार मुंडे दाम्पत्य परळी, पुणे, पिंपरीचिंचवड, पंढरपूर, रायगड, उल्हासनगर, कानपूर, उदयपूर, जयपूर, छत्तीसगड, कर्नाटक, आंध्रप्रदेश भागात तोंड लपवून फिरत होते. अखेर काल रात्री परळी दाखल होऊन पोलिसांपुढे शरण आहे. मुंडे दाम्पत्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी परळीकर करत आहे.

डॉ. मुंडेंवर कारवाई- डॉ. मुंडे हॉस्पिटल सील- मुंडे दाम्पत्याची बँक खाती गोठवली- जमीन व्यवहारांवर बंदी- माहिती देणार्‍याला 40 हजारांचं बक्षीस- 3 राज्यांमध्ये पोलीस पथकं रवाना- 3 जुलैपर्यंत शरण येण्याचे कोर्टाचे आदेश

close