धरणाने तोडलं, वारीनं जोडलं

June 18, 2012 2:44 PM0 commentsViews: 47

प्राजक्ता धुळप, पुणे

18 जून

पंढरपूरच्या वारीत कोणी आपला देव शोधतो, कोणी आनंद शोधतो, तर कोणी माणूस शोधतो. पण मावळचे वारकरी या वारीत आपली गावं शोधतायत. गावांच्या खाणाखुणा शोधतायत…

मावळच्या 84 गावांची पाणशेत धरणग्रस्त दींडी. 70 च्या दशकात वेल्हे आणि मुळशी तालुक्यातल्या 84 गावांचं पुनर्वसन झालं. धरणामुळे विखुरलेली गावं 30 वर्षांनंतर पुन्हा जवळ आली. आज या गावांचं पुनर्वसन दिडशे किलोमीटरवर दौंड तालुक्यात झालं आहे. मावळच्या दर्‍याखोर्‍यात राहणारी ही शेतकरी कुटुंब आपली रूजलेली मुळं या वारीच्या निमित्तानं भक्कम करत आहे. पुनर्वसन झाल्यावर जमिनीच्या बदल्यात जमीन मिळाली आणि पैसेही मिळाले. पण नव्या गावानं आम्हाला सामावून घेतलं नाही ही यांच्यातल्या प्रत्येकाची खंत आहे.पाणशेत धरणग्रस्त आपले पाश एकत्रीतपणे कसे सोडवता येतील याचाही विचार या 20 दिवसात होतो. माणसं जमली आणि पाश सुटले. आणखी काय हवं असतं.

close