अजूनही धुमसतेय आग

June 21, 2012 5:30 PM0 commentsViews: 6

21 जून

मंत्रालयात लागलेली भीषण आग गेल्या नऊ तासांपासून अजूनही धुमसतं आहे. सहाव्या मजल्यावर आग विझवण्याचा अग्निशमन दलाचे जवान शर्थीने प्रयत्न करत आहे. सहाव्या मजल्यावर जवान पोहचले असता दोन जणांचे मृत्यूदेह सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सहाव्या मजल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयासमोर दोघांचा गुदमरुन मृत्यू झाला आहे. उमेश पोतेकर, महेश गुगळे असं या दोघांची नावं आहे. हे दोघेही बारामती येथील रहिवासी आहे. उमेश पोतेकर हे बारामती बँकेचे माजी अध्यक्ष आहे तर गुगळे हे मर्चंट असोशियसनचे अध्यक्ष आहे. सहाव्या मजल्यावर अजूनही आग विझवण्याचे काम सुरु आहे.

close