जॉर्ज बुश यांच्यावर भिरकवलेले जोडे 50 कोटींना

December 17, 2008 2:04 PM0 commentsViews: 1

17 डिसेंबर, वॉशिंग्टन काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्यावर एका पत्रकारानं बगदाद दौर्‍यावर असताना भर पत्रकारपरिषदेत जोडे भिरकवले होते. जगातल्या सर्वात शक्तिमान समजल्या जाणार्‍या अमेरिकन अध्यक्षावर मारले गेलेले, हे जोडे आता सर्वात महाग जोडेही ठरणार आहेत. सौदी अरेबियातल्या एका वर्तमानपत्रानं या जोड्यांच्या लिलावाची बातमी प्रसिद्ध केली आहे. यातला एक जोडा घेण्यासाठी एका व्यक्तीनं तब्बल 50 कोटी रुपये मोजण्याची तयारी दाखवलीय. इराकमधील पत्रकार मुंतजिर अल जैदी यानं बुश यांच्यावर जोडे भिरकावले होते. इराकी जनता या प्रकारामुळं खूष आहे. या घटनेवर आधारित एक ऑनलाईन गेम शोही निघालाय.

close