सीएमसाहेबांचं चेंबर कसं काय वाचलं ?- अजित पवार

June 22, 2012 11:22 AM0 commentsViews: 4

22 जूनमंत्रालयाला लागलेल्या आगीत चौथ्या,पाचवा आणि सहावा मजला संपूर्ण जळून खाक झाला आहे माझी केबिनही जळून खाक झाली आहे पण मला आश्चर्य वाटते, पण सीएमसाहेबांचे चेंबर जे आहे ते कसं काय वाचले ? तिथे फारस काही नुकसान झालं नाही. मात्र मंत्रिमंडळाचा हॉल, सीएमसाहेबांच्या शेजारील काँन्फरन्स हॉल, पाचवा, सहावा मजला जळाला पण मुख्यमंत्र्यांचे चेंबर कसं काय वाचले ? असा आश्चर्यकारक प्रश्न उपस्थित केला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी. आज सकाळी अजितदादांनी मंत्रालयाची पाहणी करुन माध्यमांशी बोलतांना हा 'आश्चर्य' व्यक्त केलाा. काल मंत्रालयाला लागलेल्या आगीत तीन मजले जळून खाक झालेत. तसेच काल रात्री दोन मृतदेह सापडल्यानंतर बेपत्ता मृतदेह आज सकाळी सापडले आहे आतापर्यंत पाच जणांचा यात मृत्यू झालाय आहे. मंत्रालयाच्या कामकाजासाठी विधिमंडळात व्यवस्था करण्यात आली आहे असं अजितदादांनी सांगितलं.

close