मंत्रालय सावरलं

June 25, 2012 3:37 PM0 commentsViews: 3

25 जून

आगीच्या दुर्घटनेनंतर तीन दिवसातच मंत्रालयाचा कारभार आजपासून मंत्रालयातूनच सुरू झाला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातून कामकाजाला सुरूवात केली. यावेळी आगीत मृत्यूमुखी पडलेल्या 5 जणांच्या वारसांना 25 लाखांची मदत जाहीर करण्यात आली. पाहूया मंत्रालयाचा कारभार आज कसा सुरू झाला.गुरुवारी मंत्रालयात लागलेल्या आगीत.. कर्तव्य बजवताना जीव गमावलेल्या 5 जणांना श्रद्धांजली वाहून.. मंत्रालयाच्या कामकाजाला सुरुवात झाली. आगीत जरी 3 मजले खाक झाले असले, तरी सोमवारपासूनच.. आणि मंत्रालयातूनच कामकाज सुरू करायचं. असा निर्धार मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला होता.

मंत्रालयाच्या पहिल्या तीन मजल्यांवरून.. विस्तारित मंत्रालयातून आणि जीटी हॉस्पिटलमधून मंत्रालयाच्या कामाला सुरुवात झाली. कामसाठी लोकांनी मंत्र्यांना घरी जाऊन.. नाहीतर विधान भवनात जाऊन भेटावं, असं उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.

मंत्रालयाच्या कर्मचार्‍यांनीही शनिवार-रविवारची सुटी न घेता सोमवारपासून कामकाज कसं सुरळीत करता येईल त्याचे प्रयत्न केले. पण काम करताना अनेक अडचणी येतायत, याची कबुली छगन भुजबळांनी दिली.

एवढंच नाहीतर जनतेच्या सोयीसाठी मंत्रालयाबाहेर खास व्यवस्थाही करण्यात आली. आगीत जळून नष्ट झालेल्या फाइल्स नव्यानं तयार करण्याचं कामही जोमानं सुरू झालंय. पावसाळी अधिवेशनही वेळेत सुरू होईल, असं राज्य सरकारनं स्पष्ट केलंय.

close