मंदीमुळे ऑटो कंपन्या संकटात

December 17, 2008 2:22 PM0 commentsViews: 5

17 डिसेंबर, नवी दिल्लीस्वाती खंडेलवालमध्यंतरी गाड्यांसाठी कमी झालेली मागणी आता किमती कमी केल्यानंतर वाढल्याचं ऑटो कंपन्या सांगत आहेत. ह्युंदाई कंपनीकडे मागणी वीस टक्क्यांनी वाढलीय. पण वाहनकर्जाबाबत बँकांचे नियम आड येत आहेत, असं ऑटो इंडस्ट्रीला वाटतंय. तर मुळात दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी ग्राहकच नसल्याचं बँकांचं म्हणणं आहे. "खरंतर ऑटो कंपन्याची विक्रीच कमी झालीय कारण ग्राहकच नाहीयेत. आता आम्हीदेखील कर्ज देण्याचा बिझनेसच करतो आणि बिझनेस कोणाला नकोय,आम्ही ऑटो सेक्टरसाठी पण कर्ज देतच आहोत" असं आयसीआयसीआय बँकेचे मॅनेजर इ. वैद्यनाथन यांनी सांगितलं.ऑटो कंपन्यांची विक्री मंदावल्यामुळे त्यांना सुटे भाग पुरवणार्‍या कंपन्याही तोट्यात निघाल्यात. बँकांनी स्वस्त दरात वाहन कर्ज उपलब्ध केल्याशिवाय ऑटो कंपन्याचे ग्राहक वाढणार नाहीत, असं या सुटे भाग बनवणार्‍या कंपन्यांना वाटतंय. रतन टाटा, राहुल बजाज यांच्यासारख्या मोठ्या उद्याोजकांनीही ऑटो इंडस्ट्रीसाठी बेलआऊट पॅकेजची मागणी केली आहे.सध्या दुचाकी वाहनाच्या कर्जासाठी खाजगी बँकाचा व्याजदर 22 ते 24 टक्के आहे आणि कार्ससाठी हा दर सोळा ते अठरा टक्के इतका आहे तर कमर्शिअल वाहनांसाठी अठरा ते वीस टक्के व्याजदर आकारला जातो. एवढे महागडे व्याजदर कमी झाल्याखेरीज ऑटो सेक्टरमध्ये तेजी येणं अशक्य आहे. पण त्यासाठी पुढाकार कोणी घ्यायचा ? हाच खरा प्रश्न आहे.

close