सडलेल्या भोपळ्यापासून टोमॅटो सॉस ?

June 28, 2012 4:14 PM0 commentsViews: 54

28 जून

नागपुरात गेल्यावर्षी आरोग्याला धोकादायक असा टोमॅटो सॉस तयार करणार्‍या कंपनीवर अन्न आणि औषध प्रशासन विभागाने धाड टाकली होती. तरीही अशा पद्धतीनं लोकांच्या आरोग्याशी खेळणार्‍या व्यावसायिकांना जरब बसलेली नाही. शहरातल्या सक्करदरा भागात पुन्हा असाच प्रकार उघड झालाय. इथल्या आयुर्वेदिक ले-आऊट परिसरात एका इमारतीच्या तळमजल्यावर अतिशय अस्वच्छ पद्धतीनं सॉस तयार करण्यात येतो. सडलेल्या भोपळ्यापासून हा सॉस तयार केला जातोय. शुभम फूड प्रॉडक्ट नावाच्या या कंपनीकडे परवाना आहे. पण ज्या पद्धतीनं इथे सॉस तयार केला जातो, ते बघता हा सॉस म्हणजे लोकांच्या आरोग्याशी खेळच म्हटलं पाहिजे.

close