वसंत ढोबळेंना पूर्ण पाठिंबा – अरुप पटनायक

June 29, 2012 12:44 PM0 commentsViews: 14

29 जून

बाउन्सर्सच्या गुंडगिरीबद्दल कुणी बोलत नाही. बाऊन्सर्स हे दुसरे तिसरे कोणी नसून गुंडच असतात त्या गुंडाचा तितका दरारा तेवढा त्याचा पगार जास्त असतो. हे बाऊन्सर्स लोकांना मारहाण करतात,झोडपून काढतात तेंव्हा यांच्याविरोधात कोणी बोलत नाही पण वसंत ढोबळेंनी केलेल्या चांगल्या कारवाईबद्दल का बोलतात असा सवाल मुंबईचे पोलीस आयुक्त अरूप पटनायक यांनी केला. आयबीएन लोकमतशी बोलताना त्यांनी एसीपी वसंत ढोबळेंना पूर्ण पाठिंबा दिला आणि त्यांची कारवाई सुरूच राहील असंही ठणकावून सांगितलंय.

close