26/11 तील संशयिताला मुंबईत आणणार

December 17, 2008 9:26 AM0 commentsViews: 1

17 डिसेंबर,मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यासाठी अतिरेक्यांना मदत करणार्‍या फहीम अन्सारीला रामपूरहून मुंबईत आणायची परवानगी मुंबई क्राईम ब्रँचला मिळाली आहे. उत्तरप्रदेशमधल्या रामपूर सीआरएफमध्ये 2006 साली स्फोट केल्याप्रकरणी फहीमवर रामपूरला खटला सुरू आहे. मुंबईवरच्या हल्ल्यासाठी लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी समुद्रमार्गे मुंबईत येणार असल्याची माहिती फहीमला होती. त्यासाठी आवश्यक ते नकाशेही त्याच्याकडे सापडल्याची पोलिसांची माहिती आहे. तसंच दहशतवाद्यांना या प्रवासासाठीची मदतही त्याने केली असल्याचा संशय आहे. फहीमचा साथीदार शहाबुद्दीन अहमद यालाही उत्तरप्रदेशमधून मुंबईमध्ये आणण्यात येणार आहे.

close