राज्यात भरपूर पाऊस पडू दे, मुख्यमंत्र्यांचं विठुरायाला साकडं

June 30, 2012 12:07 PM0 commentsViews: 3

30 जून

पंढरपुरात विठ्ठलाची महापूजा पहाटे अडीच वाजता संपन्न झाली. प्रथेप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक पूजा केली. विठ्ठलाला आज पंचामृतानं अभिषेक करण्यात आला. अंगावरती लाल रंगाचं वस्त्र आणि पितांबर नेसवण्यात आलं. गळ्यात तुळशीची माळ घातल्यानं विठूरायाचे गोजिरं रुप खुलून दिसत होतं. राज्यात यंदाच्या वर्षी भरपूर पाऊस पडू दे असं साकडं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विठुरायाला घातलं.

close