‘फुटपाथवर झोपणं योग्य नाही’

July 2, 2012 2:10 PM0 commentsViews: 10

02 जुलैझालेली दुर्घटना हा एक अपघात होता, ज्या महिलेचा मृत्यू झाला ती फुटपाथवर झोपली होती आणि झोपेत ती रस्त्याच्या मध्ये आली असा दावा अभिनेता सलमान खानने केलेला आहे. फुटपाथवर झोपणं योग्य नाहीच असंही सलमानला वाटतंय. या महिलेला तिच्या कुटुंबानं घरातून काढल्यामुळेच तिच्यावर रस्त्यावर झोपायचर वेळ आली असावी असंही सलमानने म्हटलं आहे. सलमानचा भाऊ सोहेल खानच्या गाडीने एका 70 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झालाय. चंद्रबाला असं मृत्यू महिलेचं नाव आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेला त्याचा ड्रायव्हर धनंजय पिंपळे याला 10 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. वांद्र्यातल्या मेहबूब स्टुडिओजवळ ही घटना घडली. या महिलेला धडक दिल्यानंतर ड्रायव्हर धनंजय पिंपळे गाडीसह पळून गेला. आजूबाजूच्या लोकांनी या महिलेला हॉस्पिटलमध्ये नेलं, पण उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला.

close