निवृत्तीचा विचारही नाही – सचिन

July 6, 2012 1:05 PM0 commentsViews: 3

06 जुलै

सध्या मी क्रिकेटची मजा लुटतोय त्यामुळे सध्या निवृत्तीचा विचारही नाही असं स्पष्ट मत सचिन तेंडूलकरने व्यक्त केलं. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं श्रीलंकेत होणार्‍या वन डे सीरिजमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. तो सध्या युरोपमध्ये आपल्या कुटुंबाबरोबर सुट्टी एन्जॉय करतोय. दोन दिवसांपूर्वी सचिनने जर्मनीतील अदिदासच्या फॅक्टरीला भेट दिली. या फॅक्टरीतील वॉक ऑफ फेममध्ये सचिनचा समावेश केला गेला आहे. आदिदासच्या वॉक ऑफ फेममध्ये याअगोदर मोहम्मद अली आणि न्यूझीलंडच्या रग्बी टीमचा समावेश आहे. या भेटीत सचिननं 100 वी सेंच्युरी ठोकताना जे बूट घातले होते त्या बूटांवर सही करुन ते बूट फॅक्टरीला भेट म्हणून दिले. त् यानंतर सचिनने सीएनएन आयबीएनचे स्पोर्ट्स एडिटर गौरव कालरा यांना एक मुलाखत दिली.

close