सामूहिक बलात्काराला आईने केली मदत

July 6, 2012 3:12 PM0 commentsViews: 67

माधव सावरगावे, औरंगाबाद

06 जुलै

बुधवारी नागपूरमध्ये सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. आता औरंगाबादमध्ये बलात्काराचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणात बलात्कार करणार आहे माजी पोलीस अधिकार्‍याचा मुलगा, आणि त्याला मदत केली आहे ते त्याच्या आईनी. त्यामुळे एक रॅकेट यामागे असल्याचा पोलिसांना संशय आहे.

14 वर्षांची अनाथ मुलगी सामुहिक बलात्काराची बळी ठरलीये. औरंगाबादमधल्या छावणी परिसरातल्या विद्यादीप अनाथलयातून या मुलीचं बुधवारी रात्री अपहरण करण्यात आलं. आणि त्यानंतर गारखेडा परिसरात, माजी डिवाएसपी एस.के.शर्मांच्या घरी सलग दोन दिवस चार जणांनी या मुलीवर बलात्कार केला. या नराधमांमध्ये एक जण या डीवायएसपीचा मुलगा होता.

या प्रकरणी किशोर शर्मा, नंदू शिरसाठ, आनंद नागलोद आणि किरण चाबुकस्वार यांना अटक करण्यात आलीये. धक्कादायक बाब म्हणजे या मुलीचं अपहरण करायला मदत केली ती याच अनाथालयातल्या वर्षा भारती नावाच्या मुलीनं. त्यांहून धक्कादायक बाब म्हणजे.. निवृत्त डीवायएसपीच्या पत्नी जयश्री शर्माही या कटात सहभागी असल्याचा पोलिसांचा संशय आहे. वर्षा आणि जयश्री या दोघींनाही प्रवीण राठोडसोबत अटक करण्यात आलीये.

या सामूहिक बलात्कार प्रकरणात आई, मुलगा आणि त्याचे मित्र सहभागी असल्यानं हे सेक्स रॅकेट आहे का याचा पोलीस तपास घेत आहेत.

close