‘ विलासरावांना शोधा, राणेंकडून बक्षिस घ्या ‘ – नारायण राणे

December 17, 2008 4:13 PM0 commentsViews: 6

17 डिसेंबर, नागपूर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावर नारायण राणेंचं ' प्रहार ' करणं सुरुच आहे. सलग तिसर्‍या दिवशी विलासराव देशमुख विधानसभेत गैरहजर होते. यावर पत्रकारांशी बोलताना नारायण राणे म्हणाले, टीव्हीवर जाहिरात असते, आपण यांना पाहिलत का ? तुम्हीही टीव्हीवर जाहिरात द्या. विलासरावांना शोधून आणा, बक्षिस राणेंकडून घेऊन जा '. विलासराव देशमुखांव्यतिरिक्त त्यांचे सरकारवर ही आरोप करणं सुरूच ठेवलंय. व्होरा कमिटीच्या संबंधातली माहिती मागवून घ्यावी आणि गुन्हेगारांशी संबंध असणार्‍यांची चौकशी करावी, अशी मागणी राणे यांनी केली आहे. ' पोलीस, प्रशासकीय अधिकारी यांचा अतिरेकी संघटनांशी संबंध आहे का, हे तपासण्यासाठी एन. एन.व्होरा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. लोकसभेत या अहवालाचा एक भाग जाहीर झाला होता. पण व्यक्तींची नावं जाहीर केली नव्हती. ती नावं जाहीर करा ', असं नारायण राणे म्हणाले.

close