‘देवासारखी तिची वाट पाहत होतो’

July 7, 2012 4:50 PM0 commentsViews: 5

सुधाकर काश्यपसह पंकज क्षिरसागर, परभणी07 जुलै

पोटाची खळगी भरायला पालम तालुक्यातील एक पारधी कुंटुब मुंबईला गेलं. मात्र परतीच्या वेळी चोरट्यांनी त्यांच्या मुलीला पळवलं. हे अपहरण नाट्य सीसीटीव्हीत कैद झालं. हे फुटेज मीडियानं दाखवल्यामुळे.. आणि पोलिसांच्या तपासामुळे.. महिन्याभरानंतर आज हरिद्वारमध्ये सापडली. परभणीतले तिचे आई-वडील आता तिच्या परतीची वाट पाहत आहे.

मुंबई सीएसटी स्टेशनवरुन.. 10 जूनच्या पहाटे संगीता नावाच्या 3 वर्षाच्या मुलीचं अपहरण झालं. संगीताचे आईवडील झोपेत असताना.. तिला प्लॅटफार्मवरून उचलून नेतानाची दृश्यं सीसीटीव्ही कॅमेरात टिपण्यात आली होती. याचीच मदत घेऊन संगीताचा शोध सुरू झाला. मीडियावरून ही दृश्य दाखवल्यानंतर अखेरीस एका महिन्यानंतर.. दीड हजार किलोमिटर दूर हरिद्वारमध्ये ही चिमुरडी पोलिसांना सापडली.

संगीताचे आईवडील बीड जिल्ह्यातल्या पालम नावाच्या गावी मजुरी करतात. ते मुंबईत कामाच्या शोधात आले होते. पण मायानगरीत आपली लाडकी पोर गमावल्यानं. त्यांच्या घरावर दुःखाचं सावट पसरलं होतं. पण आता संगीता सापडल्यामुळे त्यांच्या आनंदाला पारावर नाही.

मुंबई पोलिसांची टीम आता लवकरच संगीताला घ्यायला हरिद्वारला जाणार आहे. काही दिवसांत संगीता आपल्या घरी परतेल. मुंबईतल्या स्टेशनवरच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांमुळे..फोटोशिवायही या गरिबाघरच्या मुलीला शोधणं पोलिसांना शक्य झालं.

close