कॉलेज तरुणांना लुटणार्‍या पोलिसांना अटक

December 17, 2008 4:16 PM0 commentsViews: 4

17 डिसेंबर, पुणे अद्वैत मेहताकॉलेज तरूणांना लुटणार्‍या दोन पोलीस कर्मचार्‍यांना फरासखाना पोलिसांनी अटक केलीय. पुण्यातल्या बुधवार पेठेतल्या रेड लाईट एरियातली ही घटना आहे. भारती विद्यापीठात इंजिनिअरिंग शाखेत शिकणारे अभिषेक आणि अविनाश बुधवार पेठच्या रस्त्यावरुन जात असताना श्रीनाथ टॉकीजसमोर एक रिक्षा त्यांच्या मोटारसायकलला आडवी आली. रिक्षातल्या दोघांनी या तरूणांना दमदाटी करून केस करण्याची धमकी देत जवळच्या एटीएम सेंटरला नेलं. 20 हजार रूपयांची मागणी केली. अखेर 3 हजार रूपयांवर तडजोड केली. फरासखाना पोलीस ठाण्यात तरुणांनी फिर्याद दाखल केली. पोलिसांनी रामदास गद्रे, आनंद अयाचित या पोलीस नाईक पदावरच्या कर्मचार्‍यांना अटक केली. लुटारू पोलिसांचा साथीदार असलेल्या रिक्षावाल्याचा पोलीस शोध घेतायत.

close