रमाबाई आंबेडकरनगर गोळीबाराला 15 वर्ष पूर्ण; जखमा मात्र ओल्याचं

July 11, 2012 1:45 PM0 commentsViews: 10

प्राजक्ता धुळप, मुंबई

11 जुलै

घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकरनगर मध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेला आज 15 वर्ष पूर्ण होतायत. 15 वर्षं उलटूनही पीडितांच्या जखमा मात्र ओल्याचं आहेत.

11 जुलै 1997… घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकरनगरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची बातमी पसरली आणि आंदोलनाने हिंसक वळण घेतलं. आणि दलित आंदोलकांवर राज्य राखीव दलाच्या पोलिसांनी बेछुट गोळीबार केला. गोळीबाराची चौकशी करण्यासाठी न्या.गुंडेवार आयोग नेमला गेला. त्यावेळी सत्तेत असणार्‍या सेना-भाजप युतीचं बनावट कथानकाचं पितळ आयोगाच्या अहवालाने उघडं पाडलं. पुढे गोळीबाराचे आदेश देणार्‍या पोलीस निरिक्षक मनोहर कदमला 11 वर्षांनतर जन्मठेपेची शिक्षा झाली. आणि नंतर जामिनही मिळाला.

पोलिसांच्या गोळीचा बळी ठरलेल्या अकरा जणांपैकी एक होता विलास दोडके. घरातला एकुलता एक आधार. आज पंधरा वर्षांनंतरही विलासच्या आईला तो प्रसंग जसाच्या तसा आठवतो. डोळ्यातलं पाणी थांबत नाही..नुकसानभरपाई मिळाली पण 'या' वेदनेची भरपाई कोण देणार ?

'मला नुकसान भरपाईचं काही नाही… पण मला एकच आस होती माझ्या मुलाची… कोण आहे माझं… एकटं जगायचं' अशा दुख:द भावना शांताबाई दोडके व्यक्त करताय.

याच पोलिसी अत्याचाराचे बळी ठरलेले मिलिंद पगारे. पोलिसांच्या अश्रूधुराची नळकांडी मिलिंद यांच्या मांडीवर फुटली. जखमी म्हणून नोंद झालेल्या मिलिंद यांना मात्र भरपाई मिळाली नाही. 15 वर्षांनंतर तर त्यांनी ही आशाच सोडून दिली.

मिलिंद पगारे म्हणतात, मी पत्रव्यवहार केला शासनाशी… पत्र दिली, रेल्वेत नोकरी मिळेल यासाठी पत्रव्यवहार, अर्जही केले.

अत्याचाराविरोधात न्याय मिळण्यासाठी रमाबाईनगरमधील रहिवासी जगदिश हिरे यांनी खूप पायपीट केली. कोर्टाने न्याय दिला पण हा न्याय कागदोपत्रीच कोर्ट-कचेरीमध्ये अडकल्याची खंत जयवंत हिरे मांडतात.

मनोहर कदमला जन्मठेपेची शिक्षा झाली. प्रलंबित आहे. पीडितांसाठी, संघर्ष करणार्‍यांना या घटनेतील दोषींना शिक्षा होईल का याबद्दल साशंकता वाटतेय.

close