माण तालुक्यात फ्लेमिंगो पक्षांची गर्दी

July 11, 2012 3:11 PM0 commentsViews: 62

11 जुलै

पाण्याअभावी माण तालुक्यातील माणसं घरदार सोडून छावण्यांवर रहायला गेली. पण दुसरीकडे याच माण तालुक्यात परदेशी पाहुणे म्हणजे फ्लेमिंगो पक्षांनी मुक्काम ठोकला आहे. तालुक्यात राजेवाडीत ब्रिटीशकालीन तलावात आजही पाणी आहे. याचा फायदा परदेशातून येणार्‍या फ्लेमिंगो पक्ष्यांना होतो. त्यामुळे राजेवाडीच्या या तलावात फ्लेमिंगोंनी गर्दी केलीय. त्यामुळे हा तलाव पक्षी निरीक्षकांचं आणि अभ्यासकांचं खास आकर्षण ठरतोय.

close