आश्रमशाळा की, गुरांचे गोठे ?

July 13, 2012 3:22 PM0 commentsViews: 74

13 जुलै

आश्रमशाळांमधल्या ढिसाळ कारभारामुळे गोंदिया जिल्ह्यात दोन मुलांचा जीव गेलाय. तर नाशिकमधल्या पेठ तालुक्यात आश्रमशाळेतही अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. आश्रमशाळेतली एक अल्पवयीन विद्यार्थीनी गर्भवती असल्याचं उघड झालंय. या घटनेनंतर आश्रमशाळांमधल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

आयसीयूमध्ये मृत्यूशी झुंज देणारा गोंदिया जिल्ह्यातील अतिदुर्गम अशा मकरधोकडा इथल्या आश्रमशाळेतील हा मुलगा. या आश्रमशाळेतल्या सहा मुलांना झोपेत असताना साप चावला. यात दोन निष्पाप मुलांचे जीव गेले. उरलेल्या चौेघांची परिस्थिती गंभीर आहे. या घटनेला आश्रमशाळेच्या व्यवस्थापनाचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचं उघड झालंय. कारण इथं कशा पद्धतीनं राहतात ते या दृश्यांमधून दिसतंय. शंभर टक्के अनुदानित आश्रमशाळा असूनही सोयी सुविधा सुविधेचा अभाव आहे.

दुसरीकडे नाशिकच्या पेठ तालुक्यातल्या आश्रमशाळेतली एक अल्पवयीन विद्यार्थीनी गर्भवती असल्याचं उघड झालंय. त्यामुळे आश्रमशाळांमधील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

आश्रमशाळांची दुरवस्था- राज्यात एकूण 1108 आश्रमशाळा – त्यापैकी 552 शासकीय आश्रमशाळा- तर 556 खाजगी संस्थांतर्फे चालवण्यात येणार्‍या अनुदानित आश्रमशाळा – सर्व मिळून एकूण 4 लाख विद्यार्थी आश्रमशाळांत राहतात

सर्व विद्यार्थ्यांना पुरेल एवढा निधी आणि साधनं शासनातर्फे पुरविली जातात. मात्र प्रत्यक्षात या आश्रमशाळा आहेत की गुरांचे गोठे अशी परिस्थिती आहे.विरोधकांनी संबंधित मंत्र्यांवर आणि सचिवांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केलीये.. तर आश्रमशाळांच्या या व्यवस्थेत सुधारणेची गरज असल्याची कबुली वनमंत्री पतंगराव कदम यांनी दिली. आदिवासी मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारनं आश्रमशाळांची योजना राबवली. पण इथे येऊनही त्यांची आबाळ थांबली नाही.

close