अपहरण झालेली संगीता मुंबईत परतली

July 12, 2012 11:46 AM0 commentsViews: 4

12 जुलै

मुंबईतल्या सीएसटी स्टेशनवरुन अपहरण झालेली संगिता, आज सुखरुप मुंबईत पोहचली. जवळपास महिनाभर अगोदर संगिताचं सीएसटी स्टेशनवरुन अपहरण झालं होतं. पण त्या अपहरणाचं सीसीटीव्ही फूटेज पोलिसांनी जारी केलंय आणि त्यानंतर तपासाची सूत्र वेगानं फिरली. दुसर्‍याच दिवशी संगीता हरिद्वारमध्ये अपहरणकर्त्यासोबत सापडली. आणि त्यानंतर या मुलीला आज रेल्वे पोलिसांनी परत आणलं. आज काही कायदेशीरबाबी पूर्ण करुन त्यानंतर तिला आई-वडिलांकडे सोपवण्यात येणार आहे.

close