सोलापुरातील संजय गांधी योजना अडचणीत

December 17, 2008 1:17 PM0 commentsViews: 16

17 डिसेंबर सोलापूरसिद्धार्थ गोदाम संजय गांधी निराधार योजनेतील सोलापूरचे लाभार्थी अडचणीत सापडले आहेत. मागील 4 वर्षांपासून सोलापुरात संजय गांधी निराधार योजनेतील निधीचं वाटपच झालेलं नाही. नवीन लाभार्थीची दखल सोलापुरातील विभाग घेत तर नाहीच, मात्र सध्या लाभार्थीचा निधीही या खात्यानं बंद केला आहे. जिल्हयात या योजनेत जवळपास 5 कोटींचा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. त्यामुळे संबंधितांवर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र तपासाच्या नावावर या निष्पाप निराधारांचाच छळ होतं आहे. सोलापुरातील महिलांना नातेवाईक तसेच इतर कुणाचा आधार नाही, सरकार पैसे देत नाही मग जगायचं कसं असा प्रश्न या निराधारांसमोर उभा राहिला आहे.आधार नसलेल्यासाठी संजय गांधी निराधार योजना कागदोपत्री आधार वाटते. सोलापुरात मात्र हा विभाग निराधाराचा असलेला आधार काढून घेत आहे.नवीन लाभार्थीना निधी तर नाहीच मात्र चालू असलेला निधी ही बंद करण्यात आला आहे. सोलापुरात घोटाळे करतात अधिकारी , मात्र दोन वेळच्या भाकरीसाठी फरपट होत आहे ती निराधार महिला आणि वृध्दांची .

close