ठाण्यात नागरिकांनी पकडला सात फुटी अजगर

July 12, 2012 4:28 PM0 commentsViews: 8

12 जुलै

ठाण्यातील बाळकुंभ परिसरात नागरिकांना 7 फुटांचा अजगर रस्त्यावर आलेला आढळून आला. स्थानिक नागरिकांनी वनाधिकार्‍यांना कळवलं. त्याआधी नागरिकांनी अजगरामुळे कोणाला इजा पोहचू नये म्हणून त्याला एका गोणीत बांधून वनाधिकार्‍यांच्या ताब्यात दिलं. पावसाच्या दिवसात हा अजगर अन्नाच्या शोधार्थ बाहेर पडला असावा असा अंदाज वनअधिकार्‍यांनी वर्तवला आहे.

close