एचआयव्हीग्रस्त विद्यार्थ्यांना डॉक्टर दाम्पत्याचा मायेचा हात

July 14, 2012 11:09 AM0 commentsViews: 15

पंकज क्षीरसागर, परभणी

14 जुलै

जन्मताच एचआयव्हीग्रस्त, त्यातच माता पित्यांचं छत्र हरवलेलं आणि समाजाकडून मिळणारी तिरकास्कारयुक्त वागणूक..परभणीतल्या 14 मुलांच्या जीवनात दोन वर्षांपूर्वीपर्यंत हीच स्थिती होती. पण डॉ.चांडक दाम्पत्यानं या मुलांची जबाबदारी उचलत त्यांच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश आणला.

सर्वसामान्य मुलांप्रमाणे हसणारी आणि गाणारी ही मुलं…पण जन्मताच एड्सची लागण असलेल्या या चिमुरड्यांच्या हास्यामागे मेहनत आणि त्याग आहे तो एका डॉ. दाम्पत्याचा…दोन वर्षांपूर्वीपर्यंत ही चौदा मुलं जीवनरेखा बालगृहात रहायची..पण बालगृह ते हॉस्पिटल एवढंच आयुष्य असलेल्या या मुलांना डॉ. पवन आणि आशा चांडक यांनी प्रवाहात आणण्याचा विडा उचलला.या मुलांना परीपूर्ण शिक्षण देण्यासाठी शाळेबरोबरच त्यांना योगासन, संगीत आणि कॉम्प्युटरचे क्लासेसही लावण्यात आले आहे. चांडक दाम्पत्याच्या मदतीला आता अनेक हातही येऊ लागले आहे.

एवढंच नाहीतर या मुलांना शाळेत नेण्या-आणण्यापासून ते त्यांची सहल इतर क्लासेसना मोफत ने-आण करण्याची जबाबदारी या रिक्षाचालकांनी उचलली आहे. एकीकडे एड्सग्रस्तांना हिन वागणूक मिळत असताना चांडक दाम्पत्याचं काम एक आदर्श ठरलंय. स्त्रीभ्रूण हत्याप्रकरणांमुळे डॉक्टरीचा पेशा बदनाम होत असताना अशाच काही डॉक्टर्समुळे या पेशाच्या पावित्र्य अजूनही कायम आहे.

close