आदिवासी विद्यार्थी उपाशी, अधिकारी तुपाशी !

July 14, 2012 3:47 PM0 commentsViews: 18

दीप्ती राऊत, नाशिक

14 जुलै

16 कोटींचं गणवेशाचं कापड… 10 कोटींची स्टेशनरी…10 कोटींची मायक्रोन्यूट्रीअन्टस.. कोट्यावधींचा खर्च करण्यात आलाय आदिवासी मुलांच्या विकासाच्या नावानं. आदिवासी आश्रमशाळेतल्या मुलांसाठी कोट्यावधीची खरेदी झाली. पण प्रत्यक्षात हे साहित्य गेलं कुठे ? मुलांपर्यंत पोहोचलं की मध्येच गायब झालं ?

नाशिकमधल्या त्र्यंबक तालुक्यातल्या तोरंगणची आश्रमशाळा. आम्ही पोहोचलो तेव्हा मुलांची जेवणाची सुट्टी झाली होती. एका शेडमध्ये पावसाने ओल्या झालेल्या फरशीवर उकीडवी बसून मुलं जेवत होती. अर्ध्यांच्या अंगात गणवेश होता, अर्ध्यांच्या गणवेशाचा पत्ता नव्हता. बहुतेक सगळ्यांचे पाय अनवाणीच. खरं तर आश्रमशाळेतल्या प्रत्येक मुलासाठी कापड…* गणवेश* पीटीचा ड्रेस* नाईटड्रेस* स्वेटरबेडिंगमध्ये…

* चादर* दरी* बेडशीट*टॉवेल आणि*ब्लँकेट

एवढी खरेदी करण्यात आलीए. पण प्रत्यक्षात…विद्यार्थ्यांना ब्लँकेट मिळाले नाहीत. मग अधिक्षकांची धावपळ सुरू झाली.. त्यांना स्टॉकरूम उघडून दाखवणं भाग पडलं. आणि त्या स्टॉकरुममध्ये सापडले वह्यापुस्तकांचे गठ्ठे, गणवेशाच्या कापडाचे तक्ते, हॅण्डवॉश आणि फिनेलचे डबे, साबणाचे बॉक्सेस, शूट, सॅण्डल्स… शैक्षणिक साहित्याचे कोरे संच, मायक्रोव्हिटॅमीन्स आणि बरंच काही..

विशेष म्हणजे या ब्लँकेट्स खरेदीत 35 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप मंत्रिमंडळातच करण्यात आला होता. प्रत्यक्षात या ब्लँकेटसची उबही या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीए.

close