आश्रमशाळेच्या साहित्यावर कर्मचारीचा डल्ला

July 16, 2012 11:37 AM0 commentsViews: 4

16 जुलै

हिंगोलीच्या शासकीय आश्रमशाळेत विद्यार्थ्यांसाठी असलेल्या साहित्यावर कर्मचारीचं डल्ला मारत असल्याचं प्रकरण समोर आलं आहे. बोथी इथल्या आश्रमशाळेत विद्यार्थ्यांकरीता चादरी, सतरंज्या आल्या होत्या. पण हे साहित्य मुख्याध्यापकाच्या घरी जात असल्याची कुणकुण गावकर्‍यांना लागली. आश्रमशाळेचा कर्मचारी दुचाकीवरुन या सतरंज्या नेत असतांना गावकर्‍यांनी त्यांना रंगेहात पकडून पोलिसांच्या हवाली केलंय.

close