उध्दव यांना डिस्चार्ज ; राज बनले सारथी !

July 16, 2012 2:07 PM0 commentsViews: 10

16 जुलै

शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांना आज संध्याकाळी सहावा वाजता लीलावती हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. उध्दव यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टारांनी मेडिकल बुलेटिन घेऊन उध्दव यांना डिस्चार्ज दिला आहे. यावेळी राज ठाकरे उपस्थिती होते. हॉस्पिटल बाहेर आल्यानंतर उध्दव यांनी हात उंचावत मी ठीक असल्याचं सांगत सर्वांना अभिवादन केला. यानंतर स्वत: राज ठाकरे उध्दव यांची कार चालवत होते आणि उध्दव शेजारील सीटवर बसले होते. यानंतर राज-उध्दव एकत्र मातोश्रीवर दाखल झाले .

close