राजेश खन्ना यांचा जीवनप्रवास

July 18, 2012 4:52 PM0 commentsViews: 76

19 जुलै

आज लाखो चाहत्यांना रडवत राजेश खन्नांनी जगाचा निरोप घेतला. हिंदी सिनेमाचा पहिला सुपरस्टार राजेश खन्ना…1969 साली आराधना हा सिनेमा रिलेज झाला.आणि हिंदी सिनेमाला सुपरस्टार मिळाला. त्यानंतर सलग 15 सिनेमे हिट्स दिले. 29 डिसेंबर 1942 साली अमृतसर इथं जन्मलेले जतीन खन्ना, भारतीय फिल्म इंडस्ट्रीमध्ये राजेश खन्ना या नावानं ओळखले जाऊ लागले. वयाच्या 24 व्या वर्षी त्यांनी आखरी खत या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

त्यानंतर राज,बहारों के सपने आणि औरत असे अनेक सिनेमे त्यांनी केले.पण ते सिनेमे फारसे चालले नाही. 1969 साली आलेल्या आराधनामुळे ते बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार ठरले. शर्मिला टागोर आणि राजेश खन्ना ही जोडी लोकप्रिय झाली. इतकचं नाही तर सगळ्या तरूणांच्या गळ्यातला ताईत बनले. त्यानंतर त्यांनी सलग चार वर्ष 15 हिट सिनेमे देत बॉलिवूडवर अधिराज्य गाजवलं. 1971 हे वर्ष त्यांच्या करिअरमधलं महत्त्वाचं वर्ष ठरलं.

कटी पतंग,आनंद,आन मिलो सजना,मेहबूब की मेहंदी, हाथी मेरे साथी,अंदाज,मेरे जीवन साथी, जोरू का गुलाम, अनुराग,दाग,नमक,अमरप्रेम,सफर,बावर्चीf?+ आणि हम शक्ल या सिनेमांची जादू बॉक्स ऑफीसवरही पहायला मिळाली…यानंतर राजेश खन्ना यांना त्यांचे फॅन्स काकाजी म्हणू लागले…त्यांची हेअरस्टाईल,त्यांच सादरीकरण आणि संवाद फेक यामुळे रोमॅण्टीक हिरो म्हणून त्यांची ओळख बनली. त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलं.बॉलिवूडमधल्या काही कलाकारांचं करिअर घडवण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.

शर्मिला टागोर,मुमताज या दोन अभिनेत्रींबरोबरची त्यांची जोडी अधिक लोकप्रिय होती.तर किशोरकुमार त्यांचा आवाज बनला होता.किशोर-राजेश खन्ना आणि आर.डी बर्मन या त्रिकुटानं भारतीय सिनेमाला आजरामर गाणी दिलीत. बॉलिवूडच्या या सुपस्टारनं जवळपास सगळ्यांचचं मन जिंकून घेतलं होतं. पण राजेश खन्नाचं प्रेम जडलं ते राजकपूर यांच्या बॉबी या सिनेमातून पदार्पण केलेली अभिनेत्री डिंपल कपाडियावर..अहमदाबाद इथल्या एका सिने कार्यक्रमासाठी जात असताना चॅटर्ड प्लेनमध्ये या प्रेमकहाणीला सुरवात झाली आणि ते विमान मुंबईला पोहचण्याच्या आतचं अख्या बॉलिवूडमध्ये डिंपल-राजेश खन्नाबद्दल चर्चाही सुरू झाल्या.

त्यावेळेस डिंपल फक्त 15 वर्षांची होती तर राजेश खन्ना जवळपास 30 वर्षांचे.1971 साली ते लग्नाच्या बेडीत अडकले.जवळपास दोन दशकं सुवर्णकाळ बघितल्.ानंतक काकाजींच्या करिअरकला 80 च्या दशकात उतरती कळा लागली.आणि त्यानंतर त्यांनी राजकारणाची वाट धरली.पण तिथं ते फार काळ रमू शकले नाही. पण त्यांचं पहिलं प्रेम राहीलं ते सिनेमा .आपल्या अभिनयानं लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य करणार्‍या सुपरस्टारला आयबीएन-लोकमतची आदरांजली.

close