चंद्रपुरात फ्लोराइडयुक्त पाण्यामुळे नागरिक त्रस्त

December 17, 2008 12:45 PM0 commentsViews: 6

17 डिसेंबर चंद्रपूर नम्रता शास्त्रकारमुलांचे दात खराब होण्याच मुख्य कारण म्हणजे जास्त चॉकेलट खाणं. पण चंद्रपूर जिल्ह्यातील काही भागात पाण्यात फ्लोराइडचे प्रमाण जास्त असल्याने या फ्लोराईडयुक्त पाण्यानं ब-याच मुलांचे दात खराब झाले आहेत. तर नागरिकांना अनेक शारीरिक व्याधी जडल्या आहेत. चंद्रपूर इथल्या डोंगरगाव इथं फ्लोराईडची खाण आहे.त्यामुळे इथल्या पाण्यात फ्लोराईडचे प्रमाण 4 ते 6% आहे.या परिसरात पाईप लाईनद्वारे गावक-यांना पाणी पुरवठा करण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. पण लोडशेडिंगमुळे लोकांना गावातलं पाणी प्यावं लागतं.दरवर्षी या गावात वैद्यकीय चमू येऊन विद्यार्थ्यांना शारीरिक तपासणी करते .या तपासणीत इथली मुलं शारीरिकदृष्ट्या कमजोर असल्याच उघड झालं आहे. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 350 गावात फ्लोराईडयुक्त पाणी आहे. त्यात कोपरगाव, जिवती , वरोरा तालुक्यात हे प्रमाण जास्त आहे.सरकारनं विविध योजनांच्या माध्यमातून 15 लाख रुपये खर्च केले. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.

close