सुपरस्टार राजेश खन्ना यांना अखेरचा निरोप

July 19, 2012 8:21 AM0 commentsViews: 2

19 जुलै

बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार राजेश खन्ना यांनी आज जगाचा अखेरचा निरोप घेतला. आज सकाळी 10 वाजता त्यांच्या आशिर्वाद बंगल्यापासून अंत्ययात्रेला सुरूवात झाली. त्यांच्या पार्थिवावर विलेपार्ले इथल्या वाघजीभाई स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक बॉलिवूडच्या मान्यवर सहभागी झाले होते. आपल्या लाडक्या 'आनंद' ला अलविदा करण्यासाठी अनेक चाहत्यांनी गर्दी केली होती यावेळी अनेकांचे डोळे पाणावले.

close