जेष्ठ क्रिकेट समालोचक सुरेश सरैय्या कालवश

July 19, 2012 1:17 PM0 commentsViews: 28

19 जुलै

जेष्ठ क्रिकेट समालोचक सुरेश सरैय्या यांचं हार्ट ऍटकनं निधन झालं. सर्वाधिक टेस्ट आणि वनडे क्रिकेटमध्ये कॉमेंट्री करण्याचा विक्रम त्यांनी केला होता.क्रिकेट कामेंट्रीतील हा भारदस्त आवाज आता काळाच्या पडद्याआड गेला आहे. टीव्हीचा जमाना येण्यापुर्वीच्या काळात सुरेश सरैय्यांच्या नजरेतून तमाम भारतीयांनी असंख्य संस्मरणीय क्रिकेट मॅच अनुभवल्या. स्पष्ट उच्चार, अचुक विश्लेष्ण आणि सोबतीला माहीतीचा खजिना ही त्यांच्या कॉमेंट्रीची खासियत होती. सुरेश सरैय्या म्हणजे क्रिकेटचा जणु चालता बोलता विश्वकोष होता. सरैय्यांशी गप्पा म्हणजे अशा असंख्य किश्यांची जणू मेजवाणीच…सरैय्यांनी भारत – ऑस्ट्रेलियादरम्यानच्या 1969 सालच्या टेस्टपासून कॉमेंट्रीला सुरुवात केली. 43 वर्षांच्या आपल्या प्रदीर्घ करीयरमध्ये त्यांनी ऑल इंडिया रेडिओ, ऑस्ट्रेलियाच्या एबीसी, न्यूझीलंड रेडिओसाठीही कॉमेंट्री केली होती. टेस्ट आणि वन डेमध्ये कॉमेंट्रीची अनोखी सेंच्युरी करणार्‍या सरैय्यांना आयबीएन लोकमतचा अलविदा…

close