कास पठाराला वादाचा ‘कुंपण’ वेढा !

July 19, 2012 5:18 PM0 commentsViews: 66

दिनेश केळुसकर, कास पठार, सातारा

18 जुलै

साातार्‍याजवळच्या कास पठाराला युनेस्कोनं जागतिक वारशाचा दर्जा दिलाय. त्यामुळे आता कास पठार चांगलंच नावाजलं आहे. पण या पठाराच्या संवर्धनाचे अनेक प्रश्न आहेत. त्याचबरोबर कास पठाराला घातलेल्या कुंपणावरून वाद सुरू झालाय. इथली जैवविविधता अबाधित ठेवण्यासाठी कास पठाराचा बफर झोन निश्चित करावा अशी मागणीही पर्यावरणवादी कार्यकर्ते करत आहे.

ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यानच्या 40 दिवसांत लाखो फुलांनी बहरून जाणारं कास पठार आता जागतिक वारसा म्हणून ओळखलं जाऊ लागलंय. त्यामुळे पूर्वीपेक्षाही इथे आता पर्यटकांची गर्दी वाढणार आहे. कास पठारांचं रक्षण करण्यासाठी इतर पर्याय न शोधता वनविभागाने या पठाराला कुंपण घातलंय आणि पठाराचे चक्क प्लॉट्स पाडलेत. त्यामुळे पठारावर येणार्‍या वन्यप्राण्यांना अटकाव झाला आहे.

या पठारावर रानडुकरं आहेत मेजॉरीटीने. त्यांच्या सहाय्याने रानकांदा खाण्यासाठी बरचसं हे पठार नांगरलं जातं. त्या उकरणीतून त्यांच्या विष्ठेतून खत मिळतं, बिया त्यात खाली जातात, आणि हे मेन्टेन झालेलं आहे. त्यानंतर पॉलीनेटर्स ज्याला म्हणतो की, किडे आहेत जे एका फुलावरून दुसर्‍या फुलावर बसणारे. त्यांना शत्रू असे या पठारावर नव्हते इतके दिवस. आता कुंपणामुळे याच्यावरपक्षी बसणार आहेत आणी ते पटापटा किडे खाऊन टाकणार आहेत म्हणजे काही वनस्पतींवर तोही परीणाम होणार आहे.

दुसरीकडे पठाराच्या आजुबाजूला साता-याकडे जाणा-या रस्त्यालगत धनिकांनी जागा घेऊन बंगले आणि हॉटेल्स बांधायला सुरुवात केलीय. इथलं नागरीकरण वाढत गेलं तर वन्य प्राणीही धोक्यात येण्याची शक्यता आहे. यामुळे इथे अभयारण्याप्रमाणे बफर झोन निश्चित करावा अशी मागणी पर्यावरणवादी कार्यकर्ते करत आहे.

जर हा इकोसेन्सेटीव्ह झोन डिक्लेर केला नाही किंवा बफर झोन जर ह्याला केला नाही साधारणत: तीनकिलोमीटर चार पाच किलोमीटर एरीयल डिस्टन्स जर त्यांनी डिक्लेर केला की, बाबा ऐवढा बफर झोन आहे. ह्यात तुम्हाला कुठलंही बांधकाम करता येणार नाही तरच हे वाचू शकेल कारण आता जर पाहता तुम्ही सातारपासूनं निघाला तर यवतेश्वर पासूनच तुम्हाला कंपाऊड दिसायला सुरुवात होतील. सगळ्या जागा गेलेल्या आहेत. काही दिवसांनी पाचगणीच होईल हे.

या कास पठारावरची फुलं ही मनमोहक असली तरी शोभेची नक्कीच नाहीत. हा अखिल विश्वातल्या जीवसृष्टीच्या अभ्यासकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे हे पठार केवळ पर्यटकांचं विकेंड डेस्टीनेशन न राहता इथल्या जैवविविधतेचं जतन करण्याची जबाबदारी आपली सर्वांचीच आहे. जागतिक वारसा मिळाल्यानंतर ती आणखीनच वाढली.

युनेस्कोच्या आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटनेच्या यादीतल्या 6 टक्के वनस्पती जगात फक्त कास पठारावर आहेत. त्यामुळे इथली जैवविविधता जपणं आणि तिचं रक्षण करणं आवश्यक आहे.

close